मुंबई :  राज्यातील यंदाच्या मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. राज्यात यंदा, जून ते सप्टेंबर दरम्यान, 99 टक्के पाऊस वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच यावर्षी समाधनकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कायमेटचा अंदाज 


राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला. यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो या कायम ठेवलाय. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही असं स्कायमेटने म्हटलंय.