मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. दुसरीकडे खतांचे दर गगनाला भिडले आहेत. आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे. शनिवारी,रविवारी प.महाराष्ट्रमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 



के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली पुढील 2 दिवसांत उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ आकाश व हलका पाऊस अपेक्षित आहे. येत्या 2 दिवसांनंतर, राज्यात किमान तापमानात 2-4°C ने हळूहळू घसरण अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात पावसाचा इशारा तर खांदेश आणि विदर्भात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.