`जलयुक्त शिवार अभियनात महत्त्वपूर्ण बदल`
जलयुक्त शिवार अभियानाला गतीशील करण्यासाठी महत्वपूर्ण बदल करण्यात येत असल्याचं मुद्रा आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
धुळे: जलयुक्त शिवार अभियानाला गतीशील करण्यासाठी महत्वपूर्ण बदल करण्यात येत असल्याचं मुद्रा आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
धुळे येथील शाहू महाराज नाट्यगृहात जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा मंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात झी २४ तासचे धुळे - नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रशांत यांना नाशिक विभागात इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी असलेल्या जलमित्र पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या झी 24 तास वृत्तवाहिनीनं केलेल्या समाजाभिमुख कामांचा गुणगौरवही यावेळी करण्यात आला.
काय आहे जलयुक्त शिवार?
जलयुक्त शिवार ही राज्यसरकारची एक योजना आहे. शिवारात (शेतात) पडलेले पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुरवणे किंवा जमिनीवर वर्षभर साठवून ठेवणे. जेणेकरून जलयुक्त शिवार योजनेमुळे नाल्यामध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदी साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत, असा या योजनेचा मूळ उद्देश आहे. या योजने अंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करावी लागतात. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१४ मध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू केले. हे अभियाने लोकांपर्यंत हळूहळू पोहोचत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात जलयुक्त शिवार अंतर्गत बऱ्यापैकी कामे झाली आहेत.