Pune Water Supply : उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी कालवा समितीची बैठक घेऊन पुणेकरांवरील पाणी संकट दूर केलं होतं.  खडकवासला धरणात शहराला पुढील किमान 5 महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीच टांगती तलवार लटकली होती. पण या बैठकीतून अजित पवार यांनी पाणीकपातीची गरज नसल्याचं सांगून पुणेकरांना दिलासा दिला आहे. पण पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाणीकपाती संदर्भात बातमी समोर आली आहे. (Important news for Pune residents regarding water! Water supply will closed in pune on thursday 29 february 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्तीमधील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करावं लागणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी 29 फेब्रुवारीला पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. तर शुक्रवारी पाणी कमी दाबाने येणार आहे. 


'या' भागांमध्ये असणार पाणी पुरवठा बंद ! (Pune Water Supply Closed on Thursday)


आदर्शनगर 
कल्याणीनगर 
हरीनगर 
रामवाडी 
शास्त्रीनगर
संपूर्ण गणेशनगर  म्हस्के वस्ती परिसर 
कळस 
माळवाडी 
जाधव वस्ती 
विशाल परिसर 
विश्रांतवाडी स. नं. 112 अ 
कस्तुरबा 
टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक 
जयजवान नगर 
जय प्रकाशनगर 
संजय पार्क
एयर पोर्ट
यमुना नगर
दिनकर पठारे वस्ती
पराशर सोसायटी 
श्री. पार्क 
ठुबे पठारे नगर