मुंबई :  आतापर्यंत मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनामुळे शहीद झाले आहेत. या पार्श्वभुमीवर मुंबईं पोलीस दलातील 50 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येतेय. या पोलीस कर्मचाऱ्यांना बारा तास काम केल्यानंतर 24 तासांची सुट्टी मिळणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकताच यासंदर्भात आदेश काढला आहे. मुंबई पोलिसांमध्ये करोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे कर्मचारी 50 वर्षांखालील आहेत आणि ज्यांची घरे ड्युटीपासून दूर आहेत त्यांना पोलीस ठाण्याच्या जवळच तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. 


हा आदेश कॉंस्टेबल ते पोलीस सब इन्स्पेक्टर पर्यंत सर्वांसाठी लागू असणार आहे. तर कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना कोविडच्या नियमांचे पालन करावे, मास्क आणि इतर बाबींचा वापर करण्याचे निर्देश ही या परिपत्रकात काढण्यात आले आहे. 


मागील वर्षी 55 वर्षावरील आणि सहव्याधी असलेल्यांना घरीच राहण्याची मुभा देण्यात आली होती.



गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील 8 हजार 655 अधिकारी, अंमलदार बाधित झाले आहेत. त्यापैकी 102 जणांचा मृत्यू झाला. कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी 7 हजार 951 पोलिसांनी कोरोनावर मात केली. दरम्यान 7 हजार 551 पोलीस कर्तव्यावर परतले. सध्या 602 पोलीस बाधित आहेत.