शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : अर्धा पावसाळा संपून गेला तरीही लातूर जिल्ह्यात अजूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील महिलांनी गावातील वटसिद्ध नागनाथाच्या पिंडीला पाण्यात बुडवून ठेवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडवळ नागनाथ येथील महिलांनी ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरातील स्वयंभू महादेवाच्या पिंडीला जलाधिवास (पाण्याखाली ठेवणे) करण्यात आला आहे.. यावेळी महिलांनी ओम नमः शिवायचा गजर करून घागरीने आणलेले पाणी महादेवाच्या गाभाऱ्यात ओतले.




पाऊस पडून दुष्काळ हटावा यासाठी वडवळ नागनाथ येथील महिलांनी केलेली प्रार्थना फलदायी ठरून लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडावा अशीच अपेक्षा सर्व जण करीत आहेत.


जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.