राज्यात कोरोनाचा कहर, `या` जिल्ह्यांत प्रकोप तर 24 तासांत 70 जणांचा मृत्यू
पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायाला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत चालला असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मुंबई : राज्यातही पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायाला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत चालला असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रूग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे 25हजारांहून अधिक रूग्ण वाढले आहे. तर, सध्या राज्यात 1 कोटी 77 हजार 560 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत आजपर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं काही नियमावली जाहीर केलीय. राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये 50 टक्केच उपस्थिती ठेवावी, असे आदेश राज्य सरकारनं दिलेत. तसंच नाट्यगृहं आणि सभागृहांमधली उपस्थितीही 50 टक्के ठेवावी, असे आदेशही देण्यात आलेत. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभांसाठी करता येणार नाही, असंही या आदेशांमध्ये म्हटले आहे.
मुंबईत सर्वाधिक रुग्ण
गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल २५ हजार ६८१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६२ करोना बाधित हे मुंबईत सापडले आहेत. चिंतेची बाब म्हणजे आत्तापर्यंत मुंबईत एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. शहरात दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लातूर, सांगलीत आकडा वाढला
लातूर जिल्ह्यात २४२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा २०० च्या वर गेलाय. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६२२ आहे. तर २४ तासात कोरोनामुळे एकाने प्राण गमावलाय. सांगलीत कोरोनाचा उद्रेक झाला असून 186 रुग्णांची भर पडलीय. गेल्या 24 तासात 19 जण झाले कोरोनामुक्त झालेत तर एकाही मृत्यूची जिल्ह्यात शुक्रवारी नोंद नाही. मालेगावात कोरोना कहर सुरूच आहे.
पुणे, नाशिकमध्ये रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ
पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासातं 2834 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 808 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. पुण्यात करोनाबाधीत २८ रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे
नाशिकमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासातं 2 हजार 508 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. शहारात1 हजार 414 तर ग्रामीण भागात 852 रुग्ण आढळलेत. नाशकात करोनाबाधीत 5 रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. मालेगावात काल182 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजारच्या पुढे गेली आहे. दर दिवशी वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झालीय.
नांदेड, अकोला येथे विक्रमी रुग्णसंख्या
नांदेडमध्ये कोरोनाची विक्रमी रुग्णसंख्या आढळली आहे. गेल्या - 24 तासात कोरोनाचे 697 पॉजिटिव्ह रुग्ण आढळले असून ऍक्टिव्ह रुग्नसंख्या 4170 वर गेली आहे तर 24 तासात 5 रुग्नांचा मृत्यु झाला आहे. नांदेडमध्ये 51 रुग्नांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
अकोल्यात 24 तासात कोरोनाचे 331 रुग्ण सापडले असून दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झलाय. जिल्ह्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजार 466 वर गेली असून सध्या अकोल्यात 5 हजार 462 रुग्ण अॅक्टिवह आहेत.
नागपुरात कोरोनाचा प्रकोप
नागपुरात कोरोनाचा प्रकोप गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. गेल्या २४ तासात 3235 कोरोनाबाधित नागपुरात वाढले... तर शहरात 2524 आणि ग्रामीण भागात 708 कोरोनाबधितांची भर पडलीय. जिल्ह्यातकोरोनाने घेतले 35 जणांचे गेल्या 24 तासात बळी घेतलेत...
परभणीत कोरोनाचा प्रादुर्भाव
परभणी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासात 215 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 10 हजार 152 जणांना परभणीत कोरोनाची लागण झाली आहे. 744 जणांवर अजूनही जिल्ह्यात उपचार सुरु आहेत तर नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.