Mumbai Central - Ahmedabad Passenger Train : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर जवळील वैतरणा रेल्वे स्थानकात विचित्र घटना घडली आहे. अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले. थोडक्यात मोठा अपघात टळला आहे.  प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद पेसेंजर ट्रेनचा थोडक्यात अपघात टळला आहे. नेहमीप्रमाणे ही गाडी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात थांबली होती. गाडी पुन्हा पुढील स्थानकात जाण्यास सुटली असता अचानक गाडीचे इंजिन डब्ब्यांपासून वेगळे होऊन पुढे गेले. 


रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा आरडा ओरडा


स्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चालकाच्या लक्षात येऊन त्याने तत्काळ इंजिन थांबविले. दरम्यान अर्धा ते पाऊण तासांनी इंजिन पुन्हा डब्ब्याना जोडून वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, गाडी वेगात असताना असा प्रकार घडला असता तर भीषण अपघातजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकली असती.


पनवेल वसई रेल्वे मार्गावर  मालगाडी घसरली


पनवेल वसई रेल्वे मार्गावर शनिवारी दुपारी मालगाडी घसरली. वसईकडे निघालेल्या मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. यामुळं पनवेल वसई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.