पुणे : Surekha Jog against FRI  In Pune : अभिनेता पुष्कर जोग याची (actor Pushkar Jog) आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात 11 बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांवर बंडगार्डन पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.


जोग एज्युकेशनच्या अकरा शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून स्व मान्यता प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच यामध्ये कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.