Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : भाऊ हा बहिणीचा पाठीराखा असतो. बहिणेचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य असते. मात्र, सख्ख्या भावानेच बहिणीच्या संसारात विष कालवल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली आहे. आपल्या बहिणीचे  भाऊजींसोबतचे खाजगी क्षणाचे फोटो या भावाने व्हायरल केले आहेत. सर्व नातेवाईकांना त्याने हे फोटो पाठवले आहेत (Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजीनगरमधील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीन आरोपीं विरोधात आयटी अ‍ॅक्टसह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. अजय पोपट पवार असे मुख्य आरोपीचे नाव आहे. आरोपी अजय हा तक्रारदार महिलेचा सख्खा भाऊ असल्याचे समजते.


आरोपीने बहिणीच्या मोबाईलमधून तिचे तिच्या पती सोबतचे खाजगी फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करुन घेतले. यानंतर त्यांने हे फोटो आपल्या इतर भावंडासह सर्व नातेवाईंकाना देखील पाठवले. फोटो सर्व नातेवाईंकामध्ये व्हायरल झाल्यानंतर हेच फोटो तक्रारदार मोहिलेच्या whatsApp नंबरवर देखील आले. एका नातेवाईकानेच तिला हे फोटो पाठवले. फोटो पाहून या महिलेच्या पायाखलाची जमीन सरकली. सख्ख्या भावानेच हे फोटो व्हायरल केल्याचे समजताच तिला मोठा धक्का बसला. अजय याने हेच फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल केले.  


या फोटोबाबत जाब विचारणाऱ्या आपल्या भावाला अजय याने शिवीगाळ करत धमकी दिली. पीडीत महिलेने याबाबत पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.  पोलिसांनी अजय सह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने हे कृत्य का केले याचा उलगडा झालेला नाही.