चंद्रपूर : राजुरा अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण, तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व सात विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची वैद्यकीय अहवालात पुष्टी झाली आहे. पोलिसांनी चौदा जणांचा समावेश असलेले एक विशेष तपास पथक स्थापन केले होते. राजुरा अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी आज एक धक्कादायक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर येथे अल्पवयीन आदिवासी मुलींवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार


या प्रकरणात तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व सात विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे तपासाला बळ मिळणार आहे. सोबतच पोलिसांनी चौदा जणांचा समावेश असलेले एक विशेष तपास पथक या प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केले आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या चौकीदाराला देखील पोलिसांनी आज अटक केली असून आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. 


पीडित मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पुरावे गोळा करण्यासाठी केवळ महिला पोलीस कर्मचारी असलेल्या दोन पथकांनी वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींचे घरी जाऊन जबाब नोंदवीत आहेत. विशेष म्हणजे शाळेचे सर्व ट्रस्टी आज तपास पथकापुढे प्रथमच हजर होणार असून त्यांचे देखील जबाब नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.