Ulhasnagar Crime News : एका वाहतूक पोलिसाला मद्यपी अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली आहे.  उल्हासनगरमध्ये हा धक्कायक प्रकार घडला. या घटेनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. रिक्षा चालक आणि त्याचा साथीदार वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करत असल्याचे  व्हिडिओमध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रिक्षा चालकाने एका तरुणीला रिक्षाची धडक दिली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडले. मात्र तो रिक्षा सोडून पळून गेला. काही वेळाने पुन्हा तो रिक्षा चालक आपली रिक्षा घेण्यासाठी आला. यावेळी वाहतूक पोलीस आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही सगळी दृश्य मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आलीये. दरम्यान यातील मारहाण करणाऱ्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


नेमकं काय घडलं?


रिक्षा चालक कॅप नंबर तीनच्या  छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूला जवळून येत असताना त्याने एका तरुणीला रिक्षाची धडक दिली त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी त्याला पकडले.मात्र तो रिक्षा सोडून पळून गेला. काही वेळाने पुन्हा तो रिक्षा चालक आपली रिक्षा घेण्यासाठी आला,यावेळी वाहतूक पोलीस आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली.यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही सगळी दृश्य मोबाईल मध्ये चित्रित करण्यात आली आहेत.


यापूर्वी देखील दुचाकीस्वारानं वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. मायकल फ्रान्सिस असं मारहाण झालेल्या पोलिसाचं नाव आहे. फ्रान्सिस यांनी नो पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी उचलून आणली होती. ही दुचाकी दंड न भरता सोडा असा आग्रह आरोपी राजेश खजनिश यानं धरला. फ्रान्सिस यांनी त्याला नकार दिल्यानं संतापलेल्या राजेशनं फ्रान्सिस यांना मारहाण केली होती.