Bike jugaad in India : बाप असावा तर असा! असं पूर्ण केलं लेकाचं बाईक घेण्याचं स्वप्न
Bike jugaad in India : मुलाचं बाईक घेण्याचं स्वप्न होतं. तर करंजामदील शाफीन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र, मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च भंगराच्या साहित्यापासून ही ई-बाईक बनवली.
गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : गरज ही शोधाची जननही आहे. मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही. परिस्थितीवर मात करत एका पित्याने लेकाचं बाईक घेण्याचं स्वप्न स्वप्न पूर्ण केले आहे. या पित्याने अनोखा जुगाड करत चक्क भंगार वस्तुंपासून बाईक (Bike jugaad) तयार केली आहे. वाशिमध्ये तयार करण्यात आलेल्या या बाईकची जोरदार चर्चा होत आहे.
मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाशिममधील शाफीन खान यांनी वेस्ट मधून ही बेस्ट ई-बाईक बनवली आहे. मुलाचं बाईक घेण्याचं स्वप्न होतं. तर करंजामदील शाफीन यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत:च भंगराच्या साहित्यापासून ही ई-बाईक बनवली.
वाशिम जिल्ह्यातील करंजा येथील राहणाऱ्या शाफीन खान हा घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा. पण, त्याचे मित्र मात्र मोटर सायकलने कॉलेजला येत असत. आपल्या मुलाने देखील बाईकवर कॉलेजला जावे अशी या पित्याची इच्छा होती. मात्र, बाईक खरेदी करायला पैसे नव्हते.
नवीन बाईक घेणे इतके पैसे नसल्याने त्यांनी जुगाड करून भंगार साहित्या पासून ई-बाईक बनवली आहे. या बाईकला आगळावेगळा लूक दिला आहे. ही बाईक पाहून त्यांच्या मुलाला वेगळाच आनंद मिळाला. शाफीन आता रोज याच बाईकने कॉलेजला ये-जा करतो.
या बाईकचा लुक अत्यंत अगळा-वेगळा असा आहे. लाखो रुपयांच्या बाईक वापरणाऱ्या शफीनच्या मित्रांनाही आता त्याच्या हा जुगाड बाईकची राईड घेण्याचा मोह आवरत नाही. ही बाईक बनवण्यासाठी रहीम खान यांना फक्त वीस हजार रुपयांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले आहे.