मुंबई : राज्यासह देशभरात 1 मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरणास (Vaccination) सुरुवात होणार आहे. पण प्रत्यक्षात इतक्या लसींचा पुरवठा झाला नसल्याचे राज्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लशींचा पुरेसा साठा नसताना इतक्या मोठ्या संख्येतील जनतेचे लसीकरण कसे करायचे ? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडलाय. त्यामुळं तीन दिवसांवर आलेली 18 वर्षांवरील वयोगटातील लसीकरण मोहिम राज्य सरकार पुढे ढकलण्याची शक्यता असल्याची माहीती सुत्रांनी दिलीय. लसच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणा बुचकळ्यात आहे. 


अगोदरच केंद्राकडून लशींचा अपुरा पुरवठा होत असल्यानं 45 वर्षांवरील व्यक्तींची लसीकरण मोहिम थंडावली आहे. तसेच राज्याला लगेचच सीरम इन्सिट्यूट आणि भारत बायोटेककडून लशींचा पुरवठा होवू शकणार नाहीय.



लस साठा नसतानाही लसीकरण मोहिम सुरू ठेवल्यास लसीकरण केंद्रावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची आरोग्य यंत्रणेला भिती आहे. 


मुंबई महापालिकेचाही लस उपलब्ध न झाल्यास 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण न करण्याचा विचार करत आहे.


 


राज्यात विक्रमी लसीकरण 
महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. यात आणखी वाढ होऊ शकते. 


राज्यात 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण झाले होते. पण आज राज्याने 5 लाखांचा टप्पा आलोंडला आहे. त्यामुळे मुख्ममंत्र्यांनी आणि आरोग्य मंत्र्यांनी सर्वांते अभिनंदन केले आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखाहून अधिक जणांचं लसीकरण झालं आहे. (Corona Vaccine)


राज्यात आज रोजी 6155 लसीकरण केंद्र आहेत. ज्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचं याआधी अभ्यासात पुढे आलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लस घेणं महत्त्वाचं आहे.