पुणे : येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस महासंचालकांच्या (डीजी) परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेला येणार आहेत. राजशिष्टाचाराप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. ते लोहगाव विमानतळावर पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात डीजीपी, आयजीपींच्या राष्ट्रीय परिषदेला गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी सायंकाळी पुण्यात दाखल झालेत. राष्ट्रीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या तीन दिवस परिषद चालणार आहे. पाषाण येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) आणि  पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) येथे ही परिषद आयोजित केली जात आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय अन्वेषण व गुन्हेशाखेचे प्रमुख आणि निमलष्करी दलाचे प्रमुखही या परिषदेला उपस्थित आहेत. 



पुण्यातील आयसर संस्थेत ही तीन दिवसीय परिषद होत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. आज रात्री त्यांचं पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानआंच्या स्वागतसाठी विमानतळावर  उपस्थित आहेत. राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मुंबईतून पुण्यात आले आहेत.


पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री रात्रीच मुंबईला परत जाणार आहेत. त्यामुळे त्यांची ही भेट अवघ्या काही मिनिटांची असेल. असे असले तरी अलीकडच्या काळातील सत्ता संघर्षानंतर हे दोघे पहिल्यांदाच समोरासमोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीत नेमक काय बघायला मिळते याबद्दल उत्सुकता आहे.