Income Tax Department Bharti 2023: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आयकर विभागात तुम्हाला चांगले आणि पदाची नोकरी मिळणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आयकर विभागाविषयी प्रत्येक तरुणांना आकर्षण असते. भारत सरकारचा हा महत्वाचा विभाग आहे. त्यामुळे येथे नोकरी मिळावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. आयकर विभागाकडून यंग प्रोफेशनल पदाची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे. तसेच उमेदवारांना भारतात कुठेही नोकरीसाठी पाठवले जाऊ शकते याची उमेदवारांनी नोंद घ्या. 



अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना नोकरीचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे. 18 सप्टेंबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. अर्ज आणि कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. 


MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज


SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार


स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. 


29 ऑगस्ट 2023 रोजी 40 वर्षे ते 45 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना अर्जासोबत 750 रुपये शुल्क भरावे लागले. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. सिनीअर वाइस प्रेसिडंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 85 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 


MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज