योगेश खरे/ नाशिक : जिल्ह्यात गुरुवार सकाळपासून सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र अद्याप सुरुच आहे. कांदा व्यापाऱ्यांचं घर, ऑफिस आणि गोडावून तपासले जात असून एकूण विभागातील दीडशे लोकांचे पथक यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. या तपासणीत खरेदी-विक्री व्यवहार, त्यातील दराची तफावत आणि डिमांड सप्लायचं गणित समजावून कारवाई करण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, सटाणा, उमराणे आणि चांदवड या तालुक्यातील बड्या कांदा व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या छाप्यांमुळे संपूर्ण बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रीय कांदा व्यापारी संघटनेचे सोहनलाल भंडारी यांच्यासह लासलगावातील राका आणि सुराणा, सटाण्याचे लुंकड तर उमराण्यात देवरे, येवळ्यात संतोष अटल यांच्याकडे तर चांदवडमध्ये प्रवीण हेडा यांच्या कडे अजूनही अधिकारी तपास करतायेत.


गेल्या पाच वर्षातील सरसरी वाढ त्याची कारणे जाणून घेत यावर्षी कांद्याची साठेबाजी, भाववाढ आणि अचानक होणाऱ्या चढ-उतारावर पंतप्रधान कार्यालय निगराणी ठेवून होते. गेल्या महिन्यात कांदा दोन चार दिवसात पंच्विशे अठाविशे रुपये पार्टी क्विंटल दराने विक्री झाल्यानं प्राप्तिकर विभागाने आपला फास आवळलाय. 


नेहमीच मागणीनुसार भाव वाढत असल्याचं सांगितलं जातं मात्र ही मागणी कशी आणि कोठे आली आणि त्यानुसार भाव वाढल्यास पुरवठा खरोखर झाला का हा या छाप्यात कळीचा मुदा आहे. यात यावेळेस केवळ प्राप्तीकर नाही तर व्यापाऱ्यांच्या मालमतांपासून त्यांच्या इतर कंपन्या, कुटुंबियांचे व्यवहाराचे सुसुत्रीकरण करून कांद्याच्या चढ उतारातील मोडस ओपरेंडीचा पर्दाफाश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.


दरवर्षी सट्टा बाजारासारखे चालणारे व्यवहार यामुळे नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. शेतकरी सुद्धा याबाबत जागरूक होत असून शेतकरी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या तपासणीत खरेदी- विक्री व्यवहार, त्यातील दराची तफावत आणि डिमांड सप्लायचे गणित समजावून कारवाई करण्यात येत आहे. 
 
अनेक ठिकाणी शेतकर्यांची बाजारसमिती पणनअधिकारी आणी व्य्पारी यांच्या संग्न्मात्ने पद्धतशीर लुट केली जातेय. छुपी आडत वेगवेगळ्या पद्धतीने काढली जात कोट्यवधी रुपयांचा काळाबाजर खुलेआमपणे होत आहे आता गरज आहे.