विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) मोठी बातमी समोर आली आहे.  छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. एकाचेवळी संभाजीनगरमध्ये 11 ठिकाणी आयकर विभागाने धाडी मारल्या आहे. बांधकाम व्यावसायिकांकडे या धाडी टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाईची सगळ्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात तब्बल 11 ठिकाणी  आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाने संभाजीनगर शहरात 11 ठिकाणी खास करून बिल्डर्सवर एकाचवेळी या धाडी टाकल्या आहे. या कारवाईत 200 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समावेश असल्याचे समोर येत आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 


गुरूवारी पहाटेच छत्रपती संभाजीनगरमध्ये बड्या बांधकाम व्यवसायिकांच्या घरांसह कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. यात जवळपास पाच मुख्य बांधकाम व्यवसायिकांसह त्यांच्याशी संबंधित गुंतवणूकदार व अन्य प्रायोजकांचीही यात चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात नेमकं काय सुरुय याची जोरदार चर्चा उद्योजकांसह सामान्यांमध्ये सुरु आहे.


मुंबई व राज्यातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटे साडेपाच वाजताच कारवाई सुरु केली होती. सुरूवातीला अधिकाऱ्यांनी बड्या व्यावसायिकांसह त्यांच्या कार्यालयांवर धाडी मारल्या. सकाळी 10 वाजल्यानंतर आयकर विभागाच्या पथकाने काही बांधकाम व्यवसायिकांच्या प्रकल्पांवर देखील धाड मारल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आयकर विभागाकडून या कारवाईसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.