नाशिक : राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याचे उघड झाले आहे. १२ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा टाकला. कांदा उत्पादकावर टाकलेल्या आयकर विभागाच्या छाप्यात २० कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार आढळून आले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये १० तर पिंपळगावात एका आणि नाशिक शहरात एका अशा १२ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारला. यावेळी संशयास्पद व्यवहार आढळल्याने काही व्यापारी रडारवर आले आहेत. याचा तसाप सखोल  केला जाणार आहे. फायदा कमी दाखविण्यासाठी वाढीव खर्चांचे हिशोब केल्याचे तपासात उघड झाले आहे.


दरम्यान, लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. आयकर विभागाने लासलगाव परिसरातील नऊ कांदा व्यापाऱ्यांवर छापा मारल्यामुळे दोन दिवसांपूर्वी एकाही व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतला आहे. निर्यात बंदी केल्यानंतर देखील कांद्याचे दर वाढत असल्याने आयकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर मारले छापेमारी केली.


त्याआधी लासलगाव बाजार समिती कांद्याच्या दरात वाढ केली होती.- सोमवारच्या तुलनेत चौथ्या दिवशी ६०० रुपयांची प्रतिक्विंटल मागे सरासरी दरात वाढ करण्यात आली होती.