राज्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ, 87 रुग्णांचा मृत्यू
नागपूर, पुणे, मुंबईत कहर सुरुच
मुंबई : राज्यात दिवसभरात तब्बल 17 हजार 864 नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 87 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये 1 हजार 922 नवे कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून नागपूरचा जिल्ह्याचा आकडा प्रथमच अडीच हजारांवर गेला आहे. नागपुरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आज तब्बल 2587 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. (State corona Update)
नागपुरातील आजपर्यंतची कोरोनाबधितांची ही सर्वाधिक वाढ आहे. तर आज कोरोनाने 18 जणांचे बळी गेले आहे. आज 1095 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे शहरात 1 हजार 954 नवे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात करोनाबाधित 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज कोरोनाबाधित 386 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3251 अजूनही उपचार घेत आहेत. आज 200 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळाला आहे. गेल्या 24 तासात कोरोना बाधित 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतल्या धारावीत आज कोरोनाचे 21 नवे रुग्ण आढळले आहेत. धारावीतील अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 113 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धारावी पॅटर्न राबवण्यात आला होता. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही घटली होती. मात्र आज चक्क 21 नवीन रुग्ण आढळले आहेत.