मुंबई : Maharashtra Political Crisis: बंडाचे निषाण फडकावलेले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाची टीम शिंदे यांच्या घराबाहेर दाखल झाली आहे. दरम्यान, नाराज एकनाथ शिंदे सध्या सुरतमध्ये आहेत. त्यामुळेच ठाण्यातल्या त्यांच्या लुईस वाडी परिसरातल्या बंगल्याजवळ पूर्णपणे शुकशुकाट आहे. तरीही खबरदारी म्हणून स्थानिक पोलिसांनी घराबाहेर पहारा वाढवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातील अनेक जुने शिवसैनिक व शिवसेना समर्थक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी दिसून येत आहेत. अनेक शिवसेना पदाधिकारी यांची सोशल मीडिया वर पोस्ट करुन एकनाथ शिंदेना समर्थन दिले आहे. साहेब बोलतील तो आदेश अशा आशयाचे पोस्ट व्हायरल होत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंशी संपर्क झाल्याचा दावा राऊत यांनी केलाय. एकनाथ शिंदे मुंबईच्या बाहेर आहेत हे राऊत यांनी मान्य केले आहे. काही आमदारांना गैरसमजातून बाहेर नेलंय असं राऊतांनी म्हटले आहे. 



एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूरतच्या द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये काही आमदारांची बैठक झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह द ग्रँड भगवतीमध्ये शिवसेनेचे 21 आमदार असल्याची माहिती आहे. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांची आहे. एकनाथ शिंदे यांची गुजरात प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी रात्रीच भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना आमदार मंत्री तानाजी सावंतही नॉट रिचेबल असल्याची माहिती उघड होत आहे.