मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव (गोवा) जाणार्‍या एसी डबलडेकरच्या प्रवाशांना येत्या दिवाळी पर्यंत जादा प्रवासी सुविधा देण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या प्रोजेक्ट उत्कृष्ट अंतर्गत मध्य रेल्वेच्या एलटीटी ते मडगाव आणि मुंबई ते पुणे डेक्कन एक्स्प्रेससह सहा ट्रेनमधील अंतर्गत प्रवासी सुविधा वाढविण्यात येणार आहेत.  
रेल्वे बोर्डाने प्रोजेक्ट उत्कृष्ट आणि प्रोजेक्ट सक्षम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. डेक्कन क्वीनचे आधुनिकीकरण येत्या 15 ऑगस्टपर्यंत तर मडगाव डबलडेकरची रचना येत्या डिसेंबर किंवा दिवाळीपर्यंत संपूर्णपणे बदललेली प्रवाशांना पहायला मिळणार आहे. या ट्रेनमध्ये फायर फायटींगची उपकरणांसह एलईडी लाईटींग, एसी कोचेसमध्ये आकर्षक पडदे, टॉयलेटचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई डिव्हिजनच्या मुंबई ते पुणे डेक्कन आणि एलटीटी ते मडगाव डबलडेकर एसी ट्रेनसह पुणे इंटरसिटी, नागपूर दुरांतो, सिद्धेश्वर एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस या गाड्यांचे प्रोजेक्ट उत्कृष्ट अंतर्गत आधुनिकीकरण होणार आहे. या ट्रेनचे संपूर्ण रूपडे बदलण्यासाठी प्रत्येक गाडीवर त्यासाठी 16 लाख रूपयांचा खर्च होणार आहे. 


या सुविधा मिळणार 


- या ट्रेनमध्ये ऑन बोर्ड हाऊसकिपिंग स्टाफ 
- जीपीएस आधारित बायोमेट्रीक अटेंडन्स सिस्टीम
- दर दोन तासांनी टॉयलेट स्वच्छ 
- टायलेटमध्ये डस्टबिन बॅग 
- पीव्हीसी फ्लोअरींग