Indapur Crime: बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असले तरी आरोपीला योग्य तीच शिक्षा मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये अशी शिक्षा झाली तरच कोणी पुढे असा गुन्हा करायला धजावणार नाही, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होतेय. असे असले तरी बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये कमी होताना दिसत नाही. नुकतीच इंदापूरमध्ये माणुसकीला काळीमा घालणारी घेणारी घटना घडली आहे.  


आरोपीला तातडीने अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदापूर तालुक्यामध्ये वद्ध व्यक्तीने आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत नको तो प्रकार केलाय. त्याहून धक्कादायक म्हणजे ही मुलगी गतीमंद होती. ही घटना समोर येताच परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 80 वर्षाच्या वृद्धाने 26 वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबधित आरोपीला तातडीने अटक केली आहे.


पोलिसांकडून गुन्हा दाखल 


वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 22 सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील एका गावामधील एका 26 वर्षीय मतीमंद मुलीवर 80 वर्षाच्या वृद्धाने बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती होताच वालचंदनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन संबधित आरोपीला अटक केली. या घटनेचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली करीत आहेत.