जावेद मुलानी, झी मीडिया, दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते आज इंदापूरमध्ये (Indapur) एका रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी शरद पवारांनी त्यांच्या डोळ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगितला. शरद पवार यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेचा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एक हशा पिकला. यावेळी शरद पवार यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानत मी त्यांचा ऋणी आहे असे म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी डोळ्यात काय बसवले मला माहित नाही. मात्र आता मला व्यवस्थित दिसते. कोण काय करते हे सांगायची माहिती घ्यायची गरज नसल्याचही सांगायला शरद पवार विसरले नाहीत.


"महिन्याभरापूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांसदर्भात प्रश्न निर्माण झाला होता. डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. मी आताच करुन टाका असे म्हटले. त्यांनी एकदम करता येणार नाही असे सांगितले. तुमचे दोन्ही डोळे बंद ठेवणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगले होणार नाही. त्यामुळे एकतरी डोळा उघडा ठेवायला पाहिजे. पाळीपाळीने तुमच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन पूर्ण करु, असे डॉक्टरांनी सांगितले. दीड महिन्याच्या काळामध्ये दोन्ही डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी डोळ्यात काय बसवले माहिती नाही पण मला आता नीट दिसत आहे. कोण काय करते हे सांगायची आता गरज नाही," असे शरद पवार म्हणाले.