मुंबई : स्वतंत्र कोकण विद्यापीठाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठाचा आवाका आणि असलेला भार लक्षात घेता स्वतंत्र कोकण विद्यापीठाची गरज असल्याची मागणी निरंजन डावखरे यांनी केली. यावर बोलताना स्वतंत्र कोकण विद्यापीठाबाबत येत्या जुनच्या आधी कोकणातील संबंधित लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. 


गेल्या काही वर्षात पेपर चेकिंग, एफिलेशन, रि चेकिंग, रजिस्ट्रेशन अशा अनेक प्रशासकीय गोष्टी या ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कोकणातून मुंबईला येण्याचा त्रास वाचला असल्याचं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. 


तरी स्वतंत्र विद्यापीठ असल्यास काही नवीन उपक्रम - अभ्यासक्रम सुरु करता येतात, असं मत तावडे यांनी व्यक्त केलं. त्यामुळे येत्या काळांत स्वतंत्र कोकण विद्यापीठ प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.