Sanjay Raut Lok Sabha Election Results 2024 Live :  लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. देशात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. यामुळे संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होण्याआधीच  INDIA  आणि  NDA मध्ये हालचाली सुरु आहेत. देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. INDIA आघाडी देशात सत्ता स्थापन करणार का? याची देखील चर्चा सुरु झाली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबक मोठे वक्तव्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकालाचं चित्र पालटल्यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली पहायला मिळत आहेत.  दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीची शक्यता. काँग्रेस तसेच भाजपकडून चंद्राबाबू नायडू, नितिश कुमारांना फोन केल्याची माहिती देखील समोर येत आहे. 
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. चारसौ पारचे दावे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केले होते. मात्र भाजपला बहुमत मिळू शकलं नाही, हा मोदी-शाह यांचा पराभव असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.  संजय राऊत यांनी यावेळी त्यांनी सत्ता स्थापनेबाबत व्यक्तव्य केले आहे.  


INDIA आघाडीचे 28 पक्ष एकमेकांच्या संपर्कात


आम्ही  28 पक्ष एकत्र बसून चर्चा करु. सर्व 28 पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत असे संजय राऊत म्हणाले. राहुल गांधीचा परफॉर्मन्स हा नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा बेस्ट आहे. हा पराभव नरेंद्र मोदींचा आहे. दहशत, पैसा यांचा वापर केल्यामुळे आमच्या काही जागा आम्ही गमावल्या आहेत. आम्हाला धनुष्यबाण नसल्याचाही फटका बसला आहे. ग्रामीण भाग तसेच आदिवासी पाड्यांमध्ये हजारो मतांचा फरक पडला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाने आम्हाला सहकार्य केले नाही. देशामध्ये परिवर्तन होतय. 


केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाचं संजय राऊत यांनी स्वागत करतानाच, निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. निवडणूक आयोग ही भाजपची स्वतंत्र शाखा असून, 4 जूनच्या संध्याकाळ नंतर कोण कोणावर कारवाई करतं हे स्पष्ट होईल असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. 


दरम्यान, NDAच्या सर्व विजयी खासदारांना दिल्लीत बोलावल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे सर्व विजयी खासदारांना दिल्लीत बोलवले आहे.   NDA, TDP, JDU, HAM, LJP, RLD, JDS, जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झाली आहेत, उद्याच्या NDA बैठकीत सरकार स्थापनेची ब्लू प्रिंट तयार होईल. आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचे स्थान दिले जाईल, खुद्द पंतप्रधान सर्व पक्षांच्या प्रमुखांचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत.


शरद पवार यांची प्रतिक्रिया


लोकसभा 2024च्या निवडणुकीत परिवर्तन दिसून आलं आहे आणि त्याची सुरुवात, महाराष्ट्रातून झाली अशी मार्मिक प्रतिक्रिया, शरद पवार यांनी दिली. लोकसभेचा हा निकाल महत्त्वाचा असून, आगामी विधानसभा निवडणुकीतही त्याचे परिणा नक्कीच दिसतील, असे सूचक संकेतही शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिले.