Hajimalang Gad Funicular station : देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याचा फिनिक्युलर रोपवे महाराष्ट्रात सुरु होणार आहे. कल्याणमधील मलंगगडावर जाण्यासाठी ही रोप वे सुरु करण्यात येत आहे. फिनिक्युलर रोपवेची टेस्टिंग सुरू असून याचे काम अतिम टप्प्यात आले आहे.  मे महिन्यात ही फिनिक्युलर रोप वे सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे. 


200 कोटींची  फिनिक्युलर रोपवे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर जाण्यासाठी देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फिनिक्युलर रोपवे उभारण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून फिनिक्युलर रोपवेची टेस्टिंग सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्थानिक आमदार आमदार किसन कथोरे यांनी फिनिक्युलर रोपवेच्या कामाची पाहणी  केली. तब्बल 200 कोटी रुपये खर्च करून ही फिनिक्युलर रोपवे तयार करण्यात आली आहे.  हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबवण्यात आला आहे.


फिनिक्युलर रोपवेच्या कामाला प्रत्यक्षात  2012 मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत होता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आणि नव्या ठेकेदाराची नेमणूक करून या कामाला गती देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून या फिनिक्स रोपेचे काम जलद गती सुरु आहे.  90 टक्के हे काम  पूर्ण झाले आहे. एवढेच नव्हे तर फिनिक्युलर ट्रेनची चाचणी देखील सुरू करण्यात आली आहे. ज्या फिनिक्युलर रोपवेची चाचणी सुरू आहे त्या फ्युनिक्युलरमध्ये बसून स्वतः आमदार किसन कथोरे अधिकाऱ्यांसह गडावर गेले. गडाच्यावर असलेल्या स्टेशनचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. सुप्रिमो सुयोग रोपवे प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर शिवशंकर लातूरे यांनी या प्रकल्पाची माहिती कथोरे यांना दिली.


डोंबिवलीत शिवसेनेतर्फे मलंगड यात्रा 


डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं  24 फेब्रुवारीला मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री शिंदे यावेळी उपस्थित राहणारे. अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली. शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दिघेंनी मलंगगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं होत.आता ही चळवळ चालू राहावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय