जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत वायूसेनेचे गरुड कमांडो मिलिंद किशोर खैरनार शहीद झालेत. खैरनार मुळचे धुळे जिल्ह्यातील साक्रीचे आहेत. आज पहाटे भारतीय सीमेत घुसखोरी करणारे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. यात तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्ऩान घातलं. पण या चकमकीत दोन जवानही शहीद झालेत. त्यात शहीद मिलिंद खैरनार यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खैरनार अवघ्या ३२ वर्षाचे होते. खैरनार यांनी २००२ मध्ये वायूसेनेत सेवा सुरू केली. त्यानंतर त्यांना गरुड कमांडो म्हणून भारतीय लष्करात सामील करून घेण्यात आलं. ६१७ गरुड फ्लाईट या युनिटचे कमांडो होते  खैरनार यांचे वडील सध्या नाशिकला राहतात.  


काश्मीर मध्ये आज सकाळी दहशतवाद्यांशी सामना करताना एअर फोर्स च्या गरूड कमांडो पथकाचे मिलिंद किशोर शहीद झाले . ते महाराष्ट्रातील नाशिक येथे होते. चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. मिलिंद किशोर खैरनार हे धुळे येथील साक्री येथे राहणारे होते.