मुंबई / पुणे : Indian Railway strike: रेल्वेचे स्टेशन मास्तर (Railway Station master) आंदोलनाच्या तयारीत आहेत. संपूर्ण भारतातील 35,000 स्टेशन मास्तर आपल्या अनेक मागण्यांसाठी 7 ऑक्टोबर 2020 पासून संघर्ष करत आहेत. आता रेल्वे मास्तर यांनी 31 मे रोजी एकाचवेळी संपूर्ण देशभरात एक दिवस सुट्टी घेण्याची घोषणा करत संपाचा इशारा दिला आहे. या दिवशी ते सामूहिक सुट्टीवर असणार आहेत.(Indian Railway Station Masters Strike)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनने स्टेशन मास्तरच्या समस्या सोडवण्यासाठी 31 मे 2022 रोजी संपूर्ण भारतभर एक दिवस सुट्टी घेण्याची घोषणा केली आहे. ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या सरचिटणीसांनी पाच कलमी मागण्यांसह रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष (सीईओ) यांना संपाची नोटीस दिली आहे.


असोसिएशनच्या या आहेत मागण्या 


- रेल्वेतील सर्व रिक्त जागा लवकर भरण्यात याव्यात
- कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्ता बहाल करणे
- स्टेशन मास्टर्सच्या संवर्गात 16.02.2018 ऐवजी 01.01.2016 पासून MACP चा लाभ द्या.
- सुधारित पदनामांसह संवर्गांची पुनर्रचना.
- रेल्वे सुरक्षित आणि वेळेवर धावण्यासाठी स्टेशन मास्तरना त्यांच्या योगदानासाठी सुरक्षा आणि तणाव भत्ता प्रदान करणे.
- रेल्वेचे खासगीकरण आणि कॉर्पोरेटायझेशन थांबवावे
- नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी


आमच्या मागण्या प्रशासनाकडून मान्य केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे दीर्घ संघर्षानंतर स्टेशन मास्तर असोसिएशनमध्ये एक दिवसाचा संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे  यांनी सांगितले.