Mumbai Local Train News Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण ठरलेलेच असते. पहिल्या लोकलपासून ते रात्रीच्या लोकपर्यंत लोकलमधील गर्दी कधीच कमी होत नाही. मुंबईची लाफइलाइन असलेल्या लोकलमध्ये आता लवकरच बदल होणार आहे. गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना लोकलचा प्रवास करता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा एक डबा आरक्षित असला तर त्यातही गर्दी असते. ही अडचण लक्षात घेऊन सध्याच्या मालडब्यातील आसन रचनेत बदल करत आसने वाढवण्याची तयारी रेल्वेने केले आहे. त्यामुळं लवकरच ज्येष्ठांचा लोकल प्रवासही आरामदायी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ नागरिकांसंबधी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर उत्तर देताना रेल्वेने मालडबा जेष्ठांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन असल्याचे म्हटले आहे. तसे प्रतिज्ञापत्र मध्य रेल्वेने सादर केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. 


66 वर्षीय के.पी पुरषोत्तम नायर यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. यात लोकलमधून दररोज 50,000 पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. मात्र, लोकलमध्ये त्यांना बसायला सोडा नीट उभे राहिलाही जागा नसते, अशं नमूद करण्यात आलं होतं. त्यावर प्रशासनाने उत्तर देताना लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवता येणार आहे. सध्याच्या आसनरचनेत बदल करण्याची चाचपणी पूर्ण झाली असून प्रत्येत डब्यात सात आसने वाढवता येतील, असं रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 


रेल्वेच्या 12 डब्ब्यांच्या लोकलमध्ये ३८ आसनांचे दोन डब्बे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतात आणि उर्वरित डबे सर्वसामान्यांसाठी राखीव असतात. सामान्य डब्ब्यांच्या तुलनेत गर्दीच्या वेळी मालडब्यातील प्रवासी भारमान एक टक्क्याहून कमी आहे. त्यामुळं मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. 


रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य डब्यात दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान्य डब्यात राखीव आसने करणे अशक्य आहे. त्यामुळंच मालडब्यात आसन व्यवस्था तयार करणे फायदेशीर आहे, मालडब्यात असलेल्या रिकाम्या जागेचा वापर करता येऊ शकतो.


दरम्यान, मालडब्यात 90 टक्के सामान्य प्रवासी आणि दहा टक्के वाहतूकदार असल्याचे मध्य रेल्वेच्या एका सर्वेक्षणात आढळले आहे. तर, लोकलच्या सामान्य डब्यात जेष्ठासाठी राखीव आसने आहेत. पण गर्दीच्यावेळी या राखीव आसनांवर तरुण बसतात. अशावेळी त्यांना जागा रिकामी करण्यास सांगणे म्हणजे वादा-वादी होते.