Alexa Speaking in Sanskrit: पुढील काही वर्षात तुमच्या घरी असणारी अलेक्सा (alexa) संस्कृत बोलू लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण जगातली सर्वात शास्त्रोक्त भाषा म्हणून प्रसिद्ध असणारी संस्कृत संगणकाला समजावी यासाठी गेली अनेक दशकं भाषा तज्ज्ञ करत असलेल्या प्रयत्नांमधून एक अत्यंत महत्वाचा शोध आता लागला आहे. ब्रिटनमधील केब्रिंज विद्यापीठात (cambriage University) भारतीय भाषा शास्त्रज्ञ डॉ. ऋषी राजपोपट (Dr. Rishi Rajpopat) यांनी केलेल्या संशोधनातून पाणिनीचं व्याकरण संगणकाला सोप्या मार्गानं समजावणारा अल्गोरिदम तयार केला आहे. डॉ. राजपोपट सध्या केंब्रिज विद्यापिठाच्या संस्कृत विभागात संशोधन (Sanskrit Reserch) करत आहेत. त्यांचा पाणिनीच्या व्याकरणासंदर्भातला अडीचशे पानी शोधनिबंध नुकताच केंब्रिज विद्यापिठानं प्रसिद्ध केला आहे. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या क्षेत्रात या संशोधनानं संगणक पाणिनिच्या व्याकरणातील सुमारे 4000 नियमांचा सुयोग्य वापर नव्या अल्गोरिदममुळे लावू शकेल असा दावा डॉ. राजपोपट यांनी केला आहे. (Indian Sanskrit Student Rishi Rajpopat create history at Cambridge university solved 2500 year old Sanskrit puzzle Marathi)


नेमकी अडचण काय होती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणतीही भाषा संगणकाला (Computer Algorithm) समजावण्यासाठी त्या भाषेच्या व्याकरणाचे नियम संगणाकाला त्याच्या भाषेतील आज्ञावलीत (Program) द्वारे समजावून द्यावे लागतात. संस्कृत भाषेचं व्याकरण पाणिनीनं लिहिलेल्या 4000 नियमांच्या अष्टाध्यायी या ग्रंथानुसार चालतं. पण पाणिनीच्या व्याकरणानुसार संस्कृत भाषा संगणकाला समजावताना एक मोठी अडचण येत असे. पाणिनी म्हणतात की एखाद्या वाक्याला जर व्याकरणाचे दोन नियम लागू होत असतील तर जो नियम 4000 नियमांच्या यादीत उशिरा येतो व तो वाक्याला लागू करावा. हे सूत्र संगणकाला समजावताना अनेक ठिकाणी अडचणी येत असतं. वाक्यांचे अर्थच बदलून जातं. त्यामुळे संस्कृत अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त भाषा असूनही ती संगणकाच्या गळी उतरवणे दुरापास्त बनत असे. डॉ. राजपोपट (Dr. Rishi Rajpopat) यांच्या संशोधनामुळे नेमकी हीच अडचण सोडवली आहे.  


संस्कृत कसं बोलणार संगणक?


डॉ. ऋषी राजपोपट यांनी लिहिलेल्या शोधनिबंधानुसार, पाणिनीच्या व्याकरण (Panini's Grammer) विषयक मूळ नियमाचा अर्थ लावतानाच चूक झाल्यानं घोळ वाढला होता. डॉ. राजपोपट यांनी केलेल्या संशोधननानुसार पाणिनीच्या व्याकरण लावण्याच्या नियमाचा नवा आणि समर्पक अर्थ शोधून काढलाय. नव्या अर्थानुसार व्याकरणाचे नियम लावताना नियम हा वाक्यातील पुढील शब्दाला लावावा असा नियमाचा अर्थ आहे. इतकी वर्ष दोन नियमांपैकी नंतरचा नियम लावाला असा अर्थ घेण्यात येत असल्यानं मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि अपवाद तयार होऊन वाक्याचा अर्थच बदलून जात असे. आता नव्या अल्गोरिदममुळे संस्कृत संगणकाला समजावताना कन्फ्यूजन होण्याचं प्रमाण बहुतांशी कमी होईल असं डॉ. राजपोपट यांचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ, देव: प्रसन्न: मंत्रै: हे या वाक्यातील मंत्रै: हा शेवटचा शब्द संगणक प्रणालीद्वारे समजावून घेणे आतापर्यंत कठीण जात होते. आता राजपोपट यांनी शब्दरचनेवर लक्ष केंद्रित करुन अल्गोरिदम तयार केल्याने संगणकासाठी हे काम सोपं जाणार आहे. 


संस्कृत संगणकाला समजल्यानं काय काय होऊ शकते?


1.सध्या जगात फक्त 25 हजार लोकांना अस्खलित संस्कृत बोलता येते. ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढून संस्कृतला नवसंजिवनी मिळेल. 
2. भारतीय उपखंडातील संस्कृतमध्ये असणारं प्राचीन ज्ञानाचे (Ancient Knowledge) भांडार साऱ्या जगासाठी खुल होईल.
3. पाणिनीचं व्याकरण हे भाषा आणि शब्द निर्माण करणारं यंत्र आहे असं संस्कृत पंडित मानतात. त्याचा व्याकरणाचा अर्थ लागल्यानं भारतीय भाषाशास्त्रातील विषेशतः इंडो-आर्यन भाषांच्या अनेक अग्यम दालनंही खुली होतील असंही मानलं जात आहे.
4. संस्कृत भाषा संगणकाला कळू लागली, की अॅलेक्सासारख्या आर्टिफिशल इंटलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित प्रणालींणमध्येही संस्कृत वापरता येईल.