भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर अमिरेकत करता येईल ड्रायव्हिंग; बिनधास्त चालवा कार आणि बाईक
भारतीयांकडे हे विशेष प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते अमेरिकाच काय जगातील कोणत्याही देशात वाहन चालवू शकतात.
Driving licence in India : वाहन परवाना अर्थात ड्रायव्हिग लायसन्स शिवाय वाहन चालवता येत नाही. वाहतूक काद्यात तसा नियमच आहे. विनापरवाना वाहन चालवताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. प्रत्येक वाहनानुसार वेगवेगळे ड्रायव्हिंग लायसन्स असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारचे वाहन परवाने असतात. मात्र, आता भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर अमिरेकत ड्रायव्हिंग करता येणार आहे. भारतीय वाहन परवान्यावर आता अमेरिकतही बिनधास्तपणे कार आणि बाईक चालवता येणार आहे.
दरवर्षी हजारो भारतीय व्यवसाय, शिक्षण, नोकरी तसेच पर्यटक म्हणून अमेरिकेत जातात. अमेरिकेत परदेशी नागरिकांसाठी अनेक कडक नियम आहेत. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह अमेरिकेत कार किंवा बाईक चालवता येत आहे. मात्र, एक विशिष्ट प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स काढल्यावर फक्त अमेरिकाचा नाही तर जगभरात कोणत्याही देशात या भारतीय ड्रायव्हिग लायन्सनवर वाहन चालवता येवू शकते.
इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स
भारतीयांकडे इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर कोणत्याही देशात वाहन चालवता येवू शकते. या ड्रायव्हिंग लायसन्सवर इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असे नमूद केलेले असते. इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे तसेच ते वापरण्याचे काही नियम आणि कायदे आहेत. परदेशात कार किंवा बाईक चालवण्यासाठी इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हा वैद्य पुरावा आहे. या परवान्याची वैधता एक वर्षासाठी असते. चीनी, जर्मन, स्पॅनिश आणि अरबीसह अनेक भाषांमध्ये देखील इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स बनवता येते. हा परवाना जगभरातील सुमारे दीडशे देशांमध्ये वैध असतो. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व्यतिरिक्त, हा परवाना वेस्टर्न इंडियन ऑटोमोबाईल असोसिएशन आणि इंटरनॅशनल ट्रॅफिक कंट्रोल असोसिएशनद्वारे दिला जातो. अमेरित ड्रायव्हिंग करायची असेल तर भारतीयांकडे इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससोबत I-94 फॉर्म असणे बंधनकार आहे. या फॉर्मवर अमेरिकेतील वाहतूकीचे सर्व नियम आणि कायदे नमूद असतात.
इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे?
इंटर नॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डोळ्यांची चाचणी घेतली जाते. नजर तीक्ष्ण असणे गरजेचे आहे. लेखी परीक्षेसोबत ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण झाले तरच हे लायसन्स मिळते. अमेरिकेत वाहन चालवण्याचे कडक नियन आहेत. अमेरिकेत उजव्या हाताने ड्रायव्हिंग केले जाते. तसेच येथे वेगमर्यादेचे देखील कटाक्षाने पालन केले जाते.