अहमदनगर : ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराजांबाबत पीसीपीएनडी समिनीने जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केला आहे. 15 दिवसात इंदुरीकर महाराजांवर कारवाई करावी करा, अन्यथा जिल्हा शल्य चिकित्सकानाच सहआरोपी करत न्यायालयीन कारवाई करण्यात येईल असं, अंनिसच्या रंजना गवांदे यांनी इशारा दिला आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना अहमदनगरच्या पीसीपीएनडी समितीनं क्लीन चीट दिली होती. त्यानंतर आता अंनिसने अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांना एक अर्ज वजा नोटीस दिली आहे. ज्यात पुरावे शोधून इंदुरीकरांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.