माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला -इंदुरीकर महाराज
इंदुरीकर महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल
पिंपरी-चिंचवड : 'गेल्या २६ वर्षात कीर्तनात जे झाले नाही ते गेल्या आठ दिवसात झाले.' असं निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं शिव जयंती निमित्त आयोजित कीर्तनामध्ये महाराज बोलत होते. 'मी जे गेले २६ वर्ष बोलतोय तेच आता ही बोलतोय, पण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला.' असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. या कीर्तनाला प्रसार माध्यमांना परवानगी नाकारण्यात आली होती, एवढच नाही तर कोणत्याही प्रकारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती.
इंदुरीकर महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल झाली असून उद्या तृप्ती देसाईही इंदूरीकरांविरोधात तक्रार द्यायला नगरमध्ये जाणार आहेत. इंदूरीकर महाराजांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. महाराजांच्या याच धड्याविरोधात आता अंनिसनं नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.
इंदूरीकर महाराजांविरोधात तृप्ती देसाईंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याही मंगळवारी नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी इंदुरीकर समर्थकांनीही चलो नगर अशी मोहीम हाती घेतली आहे. बीडमध्ये इंदूरीकर महाराजांचं रविवारी कीर्तन झालं, त्याही वेळी त्यांचं जंगी स्वागत झालं आणि कीर्तनात आय सपोर्ट इंदुरीकर असे बोर्डही झळकले.