उद्योगपती तपन पटेल यांचे अपघाती निधन
प्रसिद्ध उद्योगपती तपन पटेल यांचे अपघाती निधन झाले. शिरपूर जवळील टोल नाक्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
धुळे : खान्देशातील प्रसिद्ध उद्योगपती तपन पटेल यांचे अपघाती निधन झाले. शिरपूर जवळील टोल नाक्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले.
तपन पटेल हे आपल्या घरी परतत असताना, कुरखळी फाट्याजवळ हॉटेल गॅलक्सी समोर अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झालेत, त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र हा अपघात इतका भीषण होता की ते गंभीर जखमी झाले. त्यांचे उपचाराआधीच निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण शिरपूर तालुक्यात दुःखाचे वातावरण आहे.
माजी खासदार मुकेश पटेल यांचे चिरंजीव तर माजीमंत्री अमरीश पटेल यांचे पुतणे होत. तपण पटेल शिरपूर नगरपालिकेचे नगरसेवक होते. मध्यरात्री टोळनाक्याजवळ भीषण अपघात झाला. यावेळी गाडीचा चक्काचूर झाला. वयाच्या अवघ्या ४० वर्षांत राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नाव कमावले. त्यांच्या जाण्याने खान्देशात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
तपन यांच्या जाण्याने खान्देशातील सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे, अशी काहीनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अत्यंत मितभाषी आणि मनमिळावू असलेल्या तपन यांचे तरुणांमध्ये प्रभाव होता.