कपील पाटील, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातील कळवा इथल्या आरोग्य केंद्रात (Health Centre) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला लसऐवजी रेबीजचं इंजेक्शन दिल्याचं उघड झालं आहे. नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं असून या नर्सला निलंबित करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेबीजचं इंजेक्शन दिलेल्या व्यक्तीला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. 


महिलेला लसीचे तीन डोस


हलगर्जीपणाची ठाण्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधी ठाणे महापलिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रावर (Anand Nagar vaccination Center) लस घेण्यासाठी आलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस (Corona Vaccine) देण्यात आले होते. एकाच वेळी तीन डोस दिल्याने महिला घाबरली आणि घरी निघून गेली. आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीला हा संपूर्ण प्रकार सांगितला. 


सेलेब्रिटी लसीकरणाने वाद


त्याआधी  ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) पार्किंग प्लाझा इथल्या कोविड सेंटरमध्ये (TMC Parking Plaza Covid Center) सुपरवाझर असल्याचे सांगत चक्क एका महिला सेलेब्रिटीने (Woman celebrity) लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली होती. या महिला सेलिब्रेटीला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र देण्यात आलं होतं.