मुंबईत आझाद मैदानातील आंदोलक झाडावर चढला आणि...
Prakash Waghmare protest : आझाद मैदानात एक आंदोलक झाडावर चढला आणि धावाधाव सुरु झाली.
मुंबई : Prakash Waghmare protest : येथील आझाद मैदानात एक आंदोलक झाडावर चढला आणि धावाधाव सुरु झाली. तात्काळ फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आली. फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांनी आंदोलकाला समजवल्यानंतर झाडावरून खाली उतरविले. दरम्यान, त्याला आता आझाद मैदान पोलीस चौकीत बसवून ठेवले आहे.
झाडावर चढलेल्या आंदोलकाचे प्रकाश वाघमारे, असे नाव आहे. बीडमधील सुत गिरणी जळीतकांड प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी गेली अनेक दिवस प्रकाश वाघमारे हा आझाद मैदानात आंदोलन करत आहे. मात्र, त्याच्या मागणीला यश न आल्याने त्यांने टोकाचे पाऊल उचल झाडावर चढला आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
या आंदोलकांची पोलिसांनी गृहमंत्रीमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत भेट करून देण्यात आली होती. यावेळी त्याला आश्वासन देण्यात आली होते. मात्र, हा आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम होता. त्याचे आझाद मैदानाता आंदोलन सुरु असताना त्याने आज अचानक झाडावर चढला. त्यामुळे फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या आंदोलकाला झाडावरून खाली उतरविले.