जळगाव : भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर (BJP's official website) भाजप खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांच्या नावापुढे संतापजनक आणि अपमानकारक शब्दात (Insulting words) वर्णन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभर दखल घेतली आहे. भाजपने याप्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असा इशाराच अनिल देशमुखांनी दिला आहे. आता भाजप काय भूमिका घेते,याकडे लक्ष लागले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप (BJP ) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्याबाबत अपमानकारक शब्दात वर्णन करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर याबाबतचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. स्वाती चतुर्वेदींचे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिट्विट करत भाजपकडे दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल कारवाई करेल, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.



भाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.