ठाणे : गेल्या दोन वर्षात वॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे इकबाल कासकर चार वेळा दाऊदशी बोलला. या वॉईस कॉलवर कॉल केला तर कॉल घेणारा आणि करणारा ट्रेस होत नाही. त्याचबरोबर लोकेशनही कळत नाही आणि कॉल रेकॉर्डही होत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी स्टॅटीक आयडीचा वापर होत नाही, त्यामुळे कॉल संबंधात कोणतीही माहिती मिळत नाही, असा धक्कादायक खुलासा इकबाल कासकार याने पोलिसांसमोर केलाय. 


तर गेल्या काही वर्षांपासून दाऊदची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र त्याची प्रकृती ठीक असल्याचा खुलासा इकबालने केलाय. तर दुबईला राहण्याचा आग्रह माझ्या घरच्यांनी केला होता. 


मात्र मी तो आग्रह धुडकावून मी मुंबईला आलो. आज त्याचा मला पश्चाताप होत असल्याची त्याने सांगितलंय अशी माहिती सुत्रांनी दिलीय. क्लिफ्टन कराची अब्दुल गाजी दर्गाच्या मागे दाऊदचे तीन बंगले आहेत. 


एका बंगल्यात दाऊद आणि अनिसचे कुटुंबीय राहतात. तर बाकी दोन बंगल्यात त्याचे साथीदार राहतात अशी माहितीही पुढे आलीय.