विष्णू बुर्गे, झी मीडिया, बीड: देशभरात चर्चेत असलेल्या धर्मांतरण प्रकरणांमध्ये युपी एटीएसच्या वतीने तीन जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये एक बीडचा रहिवासी आहे. इरफान शेख सध्या दिल्लीत आहे.  इरफान दिल्लीत मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएस न ताब्यात घेतलं आहे. शिरसाळ मध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं असून सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे, असं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इरफानच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, ' अवैध धर्मांतरण प्रकरणांमध्ये इरफानचं नाव आल्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील आयोजित विद्यालयाच्या कार्यक्रमात इरफानच्या कामाचं कौतुक केलं. त्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.' सध्या हे धर्मांतरण प्रकरण चांगलचं चर्चेत आहे. 


काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा करण्यात आला होता. धर्मांतरण करणाऱ्या या मोठ्या रॅकेटमधील मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली होती.