येरवडा कारागृहात `पर्यटन` होणार सुरू
सामान्यांना अनुभवता येणार
मुंबई : कोरोनाच्या काळात पर्यटनासाठी बाहेर पडणं कठीण झालं होतं. आता राज्य सरकारने वेगळा प्रयोग करण्याचा ठरवलं आहे. येरवडा कारागृहात (Yerawada Jail open for Tourism) 'जेल पर्यटन' सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना कारागृह जवळून पाहता येणार आहेत. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
पुण्यातील येरवडा कारागृहात 'जेल पर्यटन' सुरू करण्यात येणार आहे. २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरातील जिमखाना परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. पुण्यात ५०० एकरात येरवडा कारागृह आहे. येरवडा कारागृहाला ऐतिहासिक महत्व आहे. या कारागृहात अजमल कसाबला फाशी देण्यात आली. या कारागृहाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल्या आहेत.
राज्यात ६० जेलमध्ये २४ हजार कैदी आहेत. पहिल्या टप्प्यात येरवड्यानंतर नाशिक, ठाण्यामध्ये जेल पर्यटन सुरू करणार आहेत.