नितेश महाजन, झी मीडिया, जालना : प्रेमाच्या त्रिकोणातून पोलीस शिपायाची आत्महत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. विष्णू गाडेकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेमाच्या त्रिकोणातून पोलीस प्रियकर आणि प्रेयसीच्या छळाला आणि ब्लॅक मेलिंगला कंटाळून पोलीस शिपाई विष्णू गाडेकर यांनी आत्महत्या केलीय. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे ही घटना घडली.



हसनाबाद पोलीस ठाण्यातील पोलीस प्रियकर आणि प्रेयसीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस शिपायाच्या नातेवाईकांनी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात दाखल केली होती.