जळगाव : महापौर, उपमहापौरपद निवडणुकीआधीच महापालिकेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सांगली पॅटर्नची जळगावात पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेनेनं असा दावा केला असला तरी एवढ्या जागा फोडणं शक्य नसेल. महापौर आमि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्चला संपणार आहे. 18 मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान भाजपनं नगरसेवक फुटण्याच्या केवळ अफवा असल्याचं म्हटलंय.



जळगावात सांगली पॅटर्न होणार नाही असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी म्हटलंय.