जळगाव : जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादकांना जूनच्या सुरुवातीच्या आलेल्या पावसाचा मोठा फटका बसलाय. वादळीपावसामुळे कोट्यवधी रुपयांच्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळाच्या उपसमितीने केळी उत्पादकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलाय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा एक जून आणि पाच आणि सहा जून रोजी अशा सलग तीन दिवस जळगाव जिल्ह्यातील केळी पट्ट्यात पडलेल्या जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसाने रावेर तालुक्यातील २ हजार ५३८ शेतकऱ्यांच्या सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी बागा भुईसपाट केल्या. नुकसान झालेले केळीचं पीक काढणीला आले असताना बागायतदाराचे सुमारे १३० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीनंतर महसूल विभागानं उध्वस्त झालेल्या केळी बागांचा पंचनामा केलाय. पंचनाम्याचं काम आटोपलं असून याच पंचनाम्याच्या आधारे मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे भरपाईची कमी तरतूद असली तरी ती सरकार वाढून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केळी उत्पादकांना दिलंय. 



केळीचे पीक १२ ते १४ महिन्यात परिपक्व होते. केळीला लागवडपूर्व मशागत, मजुरी, रासायनिक खतं, सिंचन यावरील सगळा खर्च पकडला तर प्रतिखोड सव्वाशे ते दीडशे रुपये खर्च येतोय. त्यामुळं सरकार करत असलेली मदत पुरेशी असणार का याबाबत शेतकऱ्यांच्या मनात मात्र साशंकता आहे.