COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : भोसरी एमआयडीसी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याततील राजकीय जुगलबंदी आजही थांबायचं नाव घेत नाही. जळगाव महापालिका निवडणुकीत आपण जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे असा मिश्किल टोला खडसे यांनी महाजनांवर लगावलाय. तर खडसे आमचे नेते आहेत त्यांना कुठंही डावललं गेलं नाही असं गिरीश महाजन म्हणताय.


राजकारण रंगलंय


शिवसेनेशी युती करण्याबाबत महाजन यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. यावेळी त्यांच्यासोबत खडसेंचे राजकीय हाडवैरी माजी मंत्री सुरेश जैन असल्यानं खडसे महाजनांवर नाराज आहेत. या बैठकीत शहराचे आमदार सुरेश भोळे हेही नव्हते. यावरून राजकारण रंगलंय.  नेतृत्वावरून दोन नेत्यांमध्ये ही जुगलबंदी रंगली आहे.