जळगाव / ठाणे : महापालिकेच्या महापौर ((Jalgaon Mayor) आणि उपमहापौर (Deputy Mayor) पदासाठी आज ऑनलाइन पद्धतीने निवडणूक (Election) होणार आहे. भाजपचा एक गट निवडणुकीआधीच शिवसेनेला जाऊन मिळाला आहे. त्यामुळे आज जळगावात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. (Jalgaon Municipal Election: BJP's fight against Shiv Sena)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक (Mayor Elections) जळगाव शहराची असली तरी दोन्ही पक्षातले अनेक नगरसेवक ठाणे आणि नाशिकमधून मतदान प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपचे 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून आणि ते ठाण्यातील 'द बाईक सूरज प्लाझा' नावाच्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती 'झी 24 तास'कडे आहे. 


त्यांच्यासोबत एमआयएमचे 3 आणि शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत. म्हणजेच एकूण 40 नगरसेवक या हॉटेलमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यातील सर्वांचं लक्ष जळगाव महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलंय. या निवडणुकीत जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे. आता भाजप सत्ता राखणार की शिवसेना बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे.


जळगाव महापालिकामध्ये एकूण 75 नगरसेवक आहेत. महपौर पदासाठी बहुमतासाठी 38 हा मॅजिक आकडा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोठात 38 नगरसेवक असल्याने शिवसेना बाजी मारणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.