मुंबई : जळगावमध्ये कोरोना बाधित‌ महिला गायब होती. तिचा‌ मृतदेह शौचालयात‌ सापडला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी राज्य सरकारने कारवाईची बडगा उगरला आहे. याप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा सिव्हिल रुग्णालयातून आठ दिवसांपासून ही कोरोनाबाधित वृद्ध महिला बेपत्ता होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी येथे दिली. 


 कोरोनाबाधित वृद्ध महिला बेपत्ता असल्याची कोणालाच कल्पना नव्हती. ज्यावेळी काही लोकांना रुग्णालयाच्या बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ही बाब उघड झाली की, कोरोनाबाधिक वृध्द महिलेचा मृतदेह शौचालयात पडला होता. जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनीही वृद्ध महिलेच्या मृत्यूची पुष्टी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटलच्या शौचालयात त्याचा मृतदेह पडलेला होता हे खरे आहे. दरवाजा आतून बंद होता.


ही वृ्द्ध महिला भुसावळ शहरातील रहिवाशी होती. तिला रेल्वेकडून सुरू असलेल्या स्थानिक रुग्णालयात सुरुवातीला दाखल केले गेले होते. १ जून रोजी महिलेला जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आणि दुसर्‍या दिवशी महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.