Jalgaon Central Jail Crime News : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गोळीबार, घरफोड्या, तस्करी यासह अन्य गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यातच भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव मध्यवर्ती कारागृहात होता. दरम्यान, आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने सात ७ वाजेच्या सुमारास दुसर्‍या आरोपीने याने मोहसीन असगर खान याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आल असता त्याला मृत घोषीत करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्शवभूमीवर जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आरोपी विरोधात गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या सर्व वाढत्या गुन्हेगारीची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे तसेच पोलीस अधीक्षक आणि जेलर यांना निलंबित करावे आणि कारागृहात चाकू सारखे धारदार हत्यार घेईलच कसं यासंदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली आहे.


जळगावतील कारागृहात कैद्याच्या झालेल्या खून प्रकरणात कारागृह रक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी जळगावातील कारागृहात पाहणी तसेच चौकशी करत ही कारवाई केली आहे.कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात दाखल मोहसीन अजगर या कैद्याचा दुसऱ्या कैद्याने चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटने प्रकरणी जळगावच्या जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


गुन्हा गंभीर घटनेची दखल घेत कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आज भेट देत कारागृहात चौकशी केली. घटनेच्या वेळी कारागृहात कर्तव्य बजावत असलेल्या कारागृह रक्षकावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर निलंबनाची कारवाई कारागृहात झालेल्या कैद्याच्या खून प्रकरणात अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू असल्याची विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी माहिती दिली. कारागृहात कैद्याकडे बाहेरून चाकू आला कसा, या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहेत. कारागृहातील खुनाच्या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर तसेच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या घटनेला जबाबदार धरत कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई मात्र घटनेवर जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईला विलंब का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.