Jalna Heavy Rain : राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने धुमशान घातले आहे. अशातच जालना येथे पाझर तलाव फुटला आहे. आधीच या तलावाला भगदाड पडले होते. मात्र, सरकारने याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पाझर तलाव फुटून 100 एकर शेतीचे नुकसान झाले आहे. 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालन्यातील अंबड तालुक्यातील दहिपुरी येथील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. बुधावरी दुपारी हा तलाव फुटला. त्यामुळे परिसरातील जवळपास 100 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली असून पिकांचं देखील नुकसान झालं आहे.


सुरुवातीला या पाझर तलावाला केवळ एक भगदाड पडलं होतं.  मात्र प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यानं हा पाझर तलाव फुटला आहे. त्यामुळे तलावात साचलेले कोट्यवधी लिटर पाणी वाया गेल असून शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालं आहे.


मनोज जरांगेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी


जालनामध्ये मनोज जरांगेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.. यावेळी जरांगेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.. दरम्यान तातडीने शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी धनंजय मुंडे यांच्याकडे केली... दरम्यान शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार असं आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांना दिलं... 


अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतीचं मोठ्याप्रमाणात नुकसान


अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतीचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय...लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्गीरच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलीये...नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला...तर तातडीने पंचनामे करून शेतक-यांना मदत करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलंय...