जालना : जालन्यात संभाजी भिडे यांचा कार्य़क्रम अखेर पोलीस बंदोबस्तात पार पडला. शिवप्रतिष्ठानच्या वतीनं संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भारिपसह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध करत घोषणाबाजी केली. यावेळी या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि ३५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या व्याख्यानात गडकोट मोहिमेसंदर्भात संभाजी भिडे मार्गदर्शन करणार होते. संभाजी भिडेंचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच भारिपसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन भिडेंच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यक्रमाला विरोध केला.


जालना शहरातील आर्य हिंदी विद्यालयात ही बैठक आयोजीत करण्यात आली होती. संभाजी भिडे यांच्या दौऱ्याला होणारा विरोध लक्षात घेता बैठकीनंतर पत्रकारांनी भिडे गुरुजींना प्रश्न विचारले असता पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.